Ratnagiri Lanja : रत्नागिरीतल्या लांजामध्ये शिवसेनेचा ठाकरे गटाला धक्का

Ratnagiri Lanja : रत्नागिरीतल्या लांजामध्ये शिवसेनेचा ठाकरे गटाला धक्का

कोकणात शिवसेनेच्या शिंदे गटाने ठाकरे गटाला धक्का दिला आहे. कारण रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा नगरपंचायतीमध्ये ठाकरे गटाच्या उपनगराध्यक्षा पूर्वा मुळये यांच्या विरोधातला अविश्वास ठराव शिंदे गटाने 13 विरुद्ध शून्य असा जिंकला आहे. अविश्वास ठराव मंजूर होताच ठाकरे गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नगराध्यक्षांसह शहर विकास आघाडीतील १४ नगरसेवकांना गटनेता म्हणुन पुर्वा मुळ्ये यांनी व्हिप बजावला होता. दरम्यान या अविश्वास ठरावावेळी शिंदे गटाचे पाच, काॅग्रेसचे दोन, अपक्ष दोन आणि भाजपचे तीन नगरसेवकसह नगराध्यक्ष यांनी मतदान केले. त्यामुळे हा अविश्वास दर्शक ठराव स्थानिक आमदार राजन साळवी यांना देखील धक्का मानला जात आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola