Ratnagiri Dengue : रत्नागिरीत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ , डेंग्यूचे 35 रुग्ण आढळले : ABP Majha
सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील काही ठिकाणी ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. अशातच रत्नागिरीत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झालीय. जून आणि जुलै महिन्यामध्ये डेंग्यूचे २७ रूग्ण आढळले होते. तर ऑगस्टमध्ये 35 रुग्ण आढळून आलेत. रूग्णांमध्ये वाढ होत असल्यानं रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात बेड्स कमी पडत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.