Ratnagiri : समुद्रकिनारी तेलाचा तवंग की शेवाळ, स्थिनिक मच्छिमार चिंतेत ABP Majha

रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर आणि रत्नागिरी तालुक्यातील काही समुद्रकिनारी सध्या तेलाचा तवंग असल्याचं बोललं जात आहे. त्याचं कारण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातला समुद्र हद्दीत सिंगापूर मधील एका कंपनीचा बार्ज उलटला आणि त्यातील तेल सध्या समुद्रकिनारी पसरल्याचे बोलले जात आहे. दरम्यान याबाबतचे नमुने सध्या तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. प्रदूषण मंडळांना मात्र हा तेलाचा तवंग नसून शेवाळचा एक प्रकार आहे. त्याचा कोणताही धोका समुद्र जिवांना नाही. मच्छीमारांनी किंवा स्थानिक आणि त्याबाबत काळजी करण्याचे कारण नसल्याचे म्हटलं आहे. अर्थात याबाबतचे नमुने तपासल्यानंतरच नेमकी माहिती समोर येणार आहे. सिंगापुरी कंपनीचे बार्शी खोल समुद्रात उलटल्यानंतर ते सध्या गुहागर तालुक्यातील  पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावरती आले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola