GanpatiPule Beach: सुट्टीमुळे पर्यटकांची कोकणाला पसंती ; गणपतीपुळे समुद्र किनारी पर्यटक
GanpatiPule Beach: सुट्टीमुळे पर्यटकांची कोकणाला पसंती ; गणपतीपुळे समुद्र किनारी पर्यटक सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी कोकणाला पसंती दिलीय. पावसामुळे कोकणाचं सौंदर्य अधिक खुललंय आणि सर्वांना भुरळ घालतंय. त्यातच पावसाने विश्रांती घेतल्याने पर्यटकांची पाऊले कोकणाकडे वळलीत. कुटुंबासह निसर्गसंपन्न कोकणात धम्माल करण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत. समुद्रकिनारे, प्रसिद्ध देवस्थान आणि धबधबे या ठिकाणी सध्या पर्यटकांची गर्दी होताना दिसतेय. एमटीडीसीच्या रिसॉर्टचं बुकिंग फुल्ल असून खासगी हॉटेल आणि लॉजला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.