Fake Karnatak Hapoos : रत्नागिरीच्या हापूसच्या नावाखाली फसवणूक, बागायतदारांकडून विक्रेत्यांना समज

Fake Karnatak Hapoos : रत्नागिरीच्या हापूसच्या नावाखाली फसवणूक, बागायतदारांकडून विक्रेत्यांना समज

हापूस आंब्याच्या नावाखाली अनेकदा कर्नाटकी आंबा ग्राहकांच्या माथी मारल्याचे प्रकार आपण अनेकदा पाहिलेत. मात्र हापूसचं जन्मगाव आणि हापूसची पंढरी असलेल्या रत्नागिरीतच कर्नाटकी आंबा विकण्याचा पराक्रम उघडकीस आलाय. रत्नागिरीतील अनेक भागांत विक्रेत्यांनी कर्नाटकी आंब्याची दुकानं थाटलीयत. त्यावरून रत्नागिरीतील स्थानिक आंबा बागायतदार आक्रमक झालेत. या बागायतदारांनी कर्नाटकी आंबा विक्रेत्यांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केलीये.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola