Rajapur : राजापुरात दुर्मिळ होत चाललेल्या चोहोळा फुलांचा बहर

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्ये निसर्गाच्या कुशीत चोहोळा फुलांचा बहर आलाल. मे आणि जून महिन्यातील वैशाख वणव्यात होरपळून निघालेल्या धरणी मातेला पर्जन्याचे वेध लागतात. जून अखेरीस झिम्माड पाऊसधारा बरसू लागतात आणि अवघी धरती हिरवा शालू लपेटून नवविवाहित सुहासिनीसारखी सजते.  कोकणातील कातळसड्यांवर कापरी कमळ, दीपकाडी, तेरडा, सोनतळ यासारख्या असंख्य फुलांचे गालिचे सजू लागतात. अनेक अनामिक आणि दुर्मिळ फुलेही या परिसरात दिसू लागतात. अशातच एका दुर्मिळ होत चाललेल्या चोहोळा या प्रजातीचे फुलं राजापूरात आढळून आलेत. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola