Rajan Salvi ACB Raid : राजन साळवी यांचं प्रकरण नेमके काय आहे?

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरीतल्या निवासस्थानी एसीबीकडून झाडाझडती सुरू आहे. राजन साळवी यांच्या निवासस्थानी एसीबीचे अधिकारी सकाळी दहा वाजता पोहचले.  त्यानंतर त्यांनी चौकशीला सुरुवात केली. दरम्यान राजन साळवी यांच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. उत्पन्नापेक्षा ११८ टक्के अधिक संपत्ती असल्याचा आरोप साळवींवर करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या पत्नी आणि मुलाचा देखील एफआयआरमध्ये आरोपी म्हणून उल्लेख आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola