Rajan Salvi ACB Raid Update : साळवींची झडती, आरोपांच्या धाडी; आत्तापर्यंत काय झालं?
Continues below advertisement
आजची सर्वात मोठी राजकीय बातमी म्हणजे ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवींच्या एसीबी चौकशीची. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आज एसीबीनं साळवींच्या घराची तब्बल साडे सहा तास झाडाझडती घेतली. त्यानंतर एसीबीनं त्यांना रत्नागिरी जिल्हा बँकेच्या शाखेत नेलं. तिथं त्यांची बँक खाती आणि लॉकरची चौकशी करण्यात येतेय. दरम्यान, आपल्याला अटक झाली तर आपण जामिनासाठी अर्ज करणार नाही, अशी भूमिका साळवींनी घेतली आहे. दरम्यान, त्यांच्या निवासस्थानाबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला.
Continues below advertisement