Raj Thackeray Ratnagiri Daura : रिफायनरीचे विरोधक आणि समर्थक राज ठाकरेंना भेटणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. गटबाजीच्या तक्रारींमुळे राज ठाकरेंनी सिंधुदुर्गची कार्यकारिणी बरखास्त केली आहे, त्या पार्श्वभूमीवर राज यांचा रत्नागिरी दौरा महत्त्वाचा मानला जातोय. या दौऱ्यात राज ठाकरे सिंधुदुर्गसाठी नवी कार्यकारणी जाहीर करतात का?, हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे रिफायनरीचे विरोधक आणि समर्थकही राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीनंतर राज ठाकरे काय भूमिका घेतात?, याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.