Raj - Uddhav Thackeray at Ratnagiri : कोकणात राजकीय आखाडा, उद्धव ठाकरे महाड, राज रत्नागिरीत सभा

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आज कोकणभूमीकडे लागलंय. कारण महाराष्ट्रातील दोन फायरब्रॅण्ड नेत्यांच्या कोकणात सभा होतायत. नाव आहे ठाकरे... बारसू येथे भेट दिल्यानंतर उद्धव ठाकरे महाडमधून आरोपांच्या फैरी झाडणारेत. त्यामुळे, ते एकनाथ शिंदे, फडणवीस, भाजप आणि राज ठाकरेंवर कसे बरसतायत याकडे सगळ्यांचे डोळे लागलेयत. बारसू प्रकल्पावरून ते कुणाकुणाला घेरणार हेही पाहणं उत्सुकतेचं असणारेय. त्याचसोबत शिंदेंसोबत गेलेल्या भरत गोगावलेंना टक्कर देण्यासाठी काँग्रेसच्या माजी महापौर ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. तर, उद्धव ठाकरेंचे बंधू आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे रत्नागिरीतून टीकांचे तोफगोळे डागणारेत. राज ठाकरे यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे रत्नागिरीची सभा चांगलीच तापणार असल्याची चर्चा सुरू झालीय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola