Parshuram Ghat Landslide : परशुराम घाटातील वाहतूक सुरू, युद्धपातळीवर काम करुन दरड हटवली
आज पहाटेपासून रत्नागिरी जिह्याला अक्षरश: पावसाने झोडपून काढलं.. मुसळधार पावसामुळे परशुराम घाटात दरड कोसळली होती....त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकच्या परशुराम घाटातील माती महामार्गावर आल्याने घाटमार्ग रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.. दरम्यान वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आलीये...त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या...दरम्यान युद्धपातळीवर काम करत घाटातील दरड बाजूला काढण्यात आली असून वाहतूक सुरळीत सुरु झालेय..