Parashuram Ghat : परशुराम घाटात दाट धुक्याची चादर, वाहतूक धीम्या गतीने सुरु : ABP Majha
सध्या वातावरणात झालेल्या बदलामुळे घाटमाथ्यांवर धुक्यांची चादर पहायला मिळतेय. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दाट धुकं पसरल्यानं पर्य़टकांचीही पावलं वळू लागलीयेत. तसंच पावसाच्या हलक्यासरीही बरसत असल्यानं घाटतली वाहतूकही धीम्या गतीनं पुढे सरकतीयेत. त्यामुळे वाहनचालकांनाही या धुक्यातून वाट काढणं कठीण जातंय.