Narayan Rane on Sharad Pawar : एखाद्या विषयासाठी अस्वस्थ झाले असते तर पवार 84 वर्ष जगले नसते
मुंबई : चार वेळा मुख्यमंत्री, 12 वर्षे केंद्रीय मंत्री आणि दोन वर्षे संरक्षणमंत्री असूनही शरद पवार काहीही करु शकले नाहीत. गेल्या 84 वर्षांत विकास कामांसाठी शरद पवार (Sharad Pawar) कधीही अस्वस्थ झाले नाही. मी राजकारणी आहे. मी काही लोकांचा अभ्यास केला आहे, शरद पवार एखाद्या विषयासाठी अस्वस्थ झाले असते तर 84 वर्षे जगले नसते, म्हणत नारायण राणेंनी (Narayan Rane) शरद पवारांवर जहरी टीका केली आहे. ते रत्नागिरीत बोलत होते.
चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, 12 वर्ष केंद्रीय मंत्री, दोन वर्ष संरक्षण मंत्री राहून काही करू शकले नाहीत. आता शरद पवारांचे वय 84 आहे. मी राजकारणी आहे. मी काही लोकांचा अभ्यास केला आहे, शरद पवार आयुष्यात एखाद्या विषयासाठी अस्वस्थ झाले असते तर 84 वर्षे जगले नसते. 84 वर्षाच्या वयात शरद पवार विकास कामासाठी कधी अस्वस्थ झाले नाही. माणसाला आजकाल हवामान बदल झाला की 50-55 वर्षात अटॅक येतो, माणसे जातात. 84 वर्षात जग इकडचं तिकडे होत पण शरद पवारांना काही होत नाही, बिनधास्त असतात. मोदींना सांगतात तुमचं सरकार गेल्याशिवाय माझी अस्वस्थता जाणार नाही, मात्र आमचं सरकार जाणार नाही.400 पेक्षा जास्त खासदार येऊन मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे.