Mumbai Goa Highway : मनसेच्या पदयात्रेचा NHAI ला धसका? ठेकेदारांच्या मशिनरीसाठी सुरक्षेची मागणी
Continues below advertisement
मुंबई गोवा महामार्गावर चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदारांच्या मशिनरीसाठी पोलिसांनी सुरक्षा पुरवावी, असं पत्र राष्ट्रीय महामार्ग विभाग कार्यकारी अभियंत्यांनी रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांना दिलं आहे. काही सामाजिक घटकांकडून कंत्राटदारांच्या सामानाचं नुकसान होऊ शकतं, मशिनरीचे स्पेअर पार्ट परदेशातून आयात केल्याशिवाय दुरुस्त होऊ शकत नाहीत, असं या पत्रात म्हटलंय. मनसेनं सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे पत्र दिल्याचं बोललं जातंय. आता पोलीस खातं खरंच कंत्राटदारांना सुरक्षा पुरवता का, ते पाहावं लागेल.
Continues below advertisement