Ratnagiri Kumbharli Ghat : रत्नागिरी जिल्ह्यातील कुंभार्ली घाट सध्या पर्य़टकांना खुणावतोय
रत्नागिरी जिल्ह्यातील कुंभार्ली घाट सध्या पर्य़टकांना खुणावत आहे. कोकणात पावसाने विश्रांती घेतल्याने सर्व निवांत आहेत. त्यामुळे नागमोडी वळणाचे घाट सर्वांना आकर्षित करत आहेत. त्यातीलच एक कुंभार्ली घाट. हिरवाईने नटलेला हा घाट सर्वांना मोहिनी घालतोय आणि सर्वांना आग्रहाने साद घालतोय. सह्याद्रीच्या करे कपारीतून काढलेला तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा कुंभार्ली घाट म्हणजे जणू निसर्गाला पडलेलं सुंदर स्वप्न आहे.