Konkan Railway Update : 15 सप्टेंबरपासून कोकण रेल्वेच्या 'या' एक्स्प्रेस विद्युत इंजिनावर धावणार
कोकण रेल्वेचा प्रवास १५ सप्टेंबरपासून सुपरफास्ट होणार आहे. कोकण रेल्वेच्या गाड्या येत्या १५ सप्टेंबरपासून विद्युत इंजिनसह धावणार आहेत.. जनशताब्दी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस, मंगला एक्सप्रेस या गाड्या १५ सप्टेंबरपासून विद्युत इंजिनसह धावणार आहेत.