Khed Dapoli Ramgad Fort : महाराष्ट्राला मिळाला नवा किल्ला, कोकणतील खेडमध्ये आढळला रामगड
Continues below advertisement
बातमी आहे तुम्हा आम्हा सर्वांना खुणावणाऱ्या गडकिल्ल्यांसंदर्भातली... कोकणात म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली आणि खेड तालुक्याच्या सीमेवरतीच रामगड नावाचा किल्ला आढळून आल्याचा दावा दुर्ग अभ्यासक संदीप परांजपे आणि पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातील अभ्यासक डॉक्टर सचिन जोशी यांनी केला आहे... खेड तालुक्यात असलेल्या पालगडपासून जवळच्या एका डोंगरावर हा नवा रामगड किल्ला आढळून आला आहे. अभ्यासकांनी इतिहासातील संदर्भ आणि वास्तू रचनेतील शास्त्रीय पुराव्यावर आधारित असा प्राथमिक अहवाल सादर केला आहे. याच ठिकाणी असलेल्या पालगडसाठी हा जोडकिल्ला असावा असा अंदाज देखील अभ्यासाकांनी वर्तवला आहे.
Continues below advertisement