Anil Parab Sai Resort Case : अनिल परब यांना ED कडून धक्का, साई रिसॉर्ट प्रकरणी संपत्ती जप्त
मुंबई : शिवसेना नेते अनिल परब ( Anil Parab ) यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आलीय. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आलीय. ईडीने दिलेल्या माहितीनुसार 10. 20 कोटी रूपयांची संपत्ती जप्त करण्यात आलीय. ईडीने ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. परंतु, या प्रकरणाशी माझा काही संबंध नसून कारवाई झाली असेल तर याबाबत मी कोर्टात दाद मागणार असल्याचे अनिल परब यांनी या कारवाईनंतर म्हटले आहे.