CM Eknath Shinde Ratnagiri Daura : संकल्प अभियानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर
Continues below advertisement
संकल्प अभियानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजापूर इथे सभा घेणार आहेत. दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री राजापूरमध्ये दाखल होतील. सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघावरुन भाजप आणि शिवसेना यांच्यात दावे प्रतिदावे आणि उमेदवार निवड यावरुन अनेक चर्चा रंगल्या आहेत. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत सध्या खासदारकीसाठी इच्छुक आहेत. तर भाजपने रवींद्र चव्हाण यांना आदेश दिल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या राजापूर इथे मुख्यमंत्र्यांची सभा होईल. शिवाय बारसू रिफायनरी विरोधक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याला अनेक अर्थाने महत्त्व आहे.
Continues below advertisement