Biparjoy Cyclone Effect Ratnagiri : किनाऱ्यावरील छोट्या दुकानांना फटका,काही दुकानं उद्ध्वस्त
Continues below advertisement
बिपरजॉय चक्रीवादळ ईशान्येकडे सरकतोय मात्र वादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर पाहायला मिळतोय. वादळ आणि मान्सून दाखल झाल्यानं गणपतीपुळे समुद्राला चांगलचं उधाण आलंय.. यामुळे किनाऱ्यावरील छोट्या दुकानांना फटका बसलाय, तर काही दुकानं उद्ध्वस्त झाली.. एवढंच नाहीतर मोठ्या लाटेमुळे काही पर्यटक जखमी झाल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे एबीपी माझा तुम्हाला आवाहन करतंय... की पुढचे दोन दिवस पर्यटकांनी समुद्रात जाण्याचा प्रयत्न करु नये... कुठलंही असं धाडस करु नका जो जीवावर बेतेल... समुद्र खवळलेला असताना धाड़सी कृत्य करणं टाळा...
Continues below advertisement