Ramdas Athawale supports #Kangana | शिवसेनेनं धमकी देणं योग्य नाही, आठवलेंचा कंगनाला पाठिंबा

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरच्या केल्यामुळे अभिनेत्री कंगना रनौत राजकीय नेत्यांसह अनेकांच्या निशाण्यावर आहे. मात्र कंगनाच्या पाठिशीही काहीजण उभे राहत आहेत. रिपाईचं अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कंगनाची पाठराखण केली आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. अभिनेत्री कंगना रनौतला तिचे मत मांडण्याचा आणि मुंबईत राहण्याचाही अधिकार आहे. सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने धमकी देणे योग्य नाही. कंगना रणौतला आरपीआय संरक्षण देईल, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola