Corona Help | पिंपरी-चिंचवडच्या राष्ट्रवादी नगरसेवकाचं योगदान, वाढदिवसाचा खर्च टाळत 45 ऑक्सिजन सिलेंडरची मदत
ऑक्सिजन अभावी कोरोना अनेक रुग्णांचे मृत्यू झालेत. हीच बाब लक्षात घेत पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू मिसाळ यांनी वाढदिवसाचा खर्च टाळला आणि महापालिका आरोग्य विभागाला 45 ऑक्सिजन सिलेंडरची मदत केलीये. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते हे ऑक्सिजन सिलेंडर आरोग्य विभागाला सुपूर्त ही करण्यात आले. मिसाळांच्या कौतुकास्पद पावलाच पवारांनी ही कौतुक केलं. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी.