Rajmata Jijabai Birth Anniversary : राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा,लखुजी जाधव वाड्यात महापूजन
बुलढाणा : आज 12 जानेवारी, राजमाता जिजाऊंचा जन्मदिन... यानिमित्ताने सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी म्हणजे राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यातील जन्मस्थळी आज सकाळी साडेपाच वाजता जिजाऊंच्या तेराव्या वंशाजानी महापूजन केलं. यावेळी कोरोनाचे निर्बंध असल्याने राजवाड्यात फक्त मोजक्याच 50 जणांनाच प्रवेश देण्यात आला. महापूजन झाल्यावर माता जिजाऊंना वंदना करण्यात आली. शासकीय पूजन झाल्यावर लगेचच राजवाडा कोरोनाचे निर्बंध असल्याने बंद करण्यात आला.