MNS | कल्याण-डोंबिवलीत मनसेला मोठं खिंडार, राजेश कदम, मंदार हळबे यांचा पक्षाला रामराम

मुंबई : आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत मनसेला जोरदार हदरे बसत आहेत. सोमवारी डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आज मनसेला दुसरा धक्का बसला आहे. मनसेचे नगरसेवक आणि गटनेते मंदार हळबेंनी भाजपात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. मनसेला लागलेल्या या गळतीनंतर मनसेचे काही प्रमुख नेते कृष्णकुंजवर दाखल झाले आहेत. कल्याण ग्रामीणचे आमदार राजु पाटील, नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर कृष्णकुंजवर दाखल झाले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola