हापूस आंब्याला 1 लाखांचा विक्रमी भाव, 100 वर्षातील ऐतिहासिक दर, उद्योजक राजेश अथायडेंकडून खरेदी
राजापूरमधील बाबू अवसरे या शेतकऱ्याच्या 5 डझन हापूस आंब्याच्या पेटीला तब्बल 1 लाख 8 हजारांचा विक्रमी भाव मिळाला आहे. कोकणातील हापूस आंब्याला जगभरातील बाजारपेठ थेट विक्रीसाठी उपलब्ध करून देत शेतकऱ्यांना अधिकाधिक स्वावलंबी बनवण्यासाठी 'ग्लोबल कोकण' आणि 'मायको' या देशातील पहिल्याच मँगोटेक प्लॅटफॉर्मद्वारे पुढाकार घेण्यात आला आहे.