Maharashtra Monsoon | गडचिरोलीत मुसळधार पाऊस; पर्लकोटा नदीला पूर

जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे भामरागड तालुका मुख्यालयाला लागून असलेल्या पर्लकोटा नदीला पूर आला आहे. पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ झाली असून पुराचा पाणी शहरात प्रवेश केला आहे. त्यामुळे अनेक घरे पाण्याखाली आले आहेत. मध्यरात्री 3 वाजेच्या दरम्यान पुराचा पाणी शहरात शिरायला सुरुवात झाल्याने प्रशासन आणि नागरिकांची धावपळ उडाली. पाण्याखाली आलेल्या अनेक घरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून संपूर्ण शहराला सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनाने केलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola