Bharat Gogawale vs Snehal Jagtap : भरत गोगावलेंसमोर मोठं आव्हान? स्नेहल जगताप ठाकरे गटात?

रत्नागिरी जिल्ह्यात रामदास कदम आणि योगेश कदम यांच्या विरोधात संजय कदम यांच्या रूपाने चेहरा दिल्यानंतर आता ठाकरे गटाने भरत गोगावले यांच्या महाड या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. उद्धव ठाकरे यांची सहा मे रोजी सभा होण्याची शक्यता आहे. पण महाड येथील जाहीर सभेत महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप या काँग्रेसमधून शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. जगताप या महाडमधील काँग्रेसचे माजी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत. त्यामुळे भरत गोगावले यांच्या विरोधात स्नेहल जगताप या आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार असू शकतात. रायगड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा रंगली आहे. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola