Shivrajyabhishek 2024 : धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक दिन

Shivrajyabhishek 2024 : युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishek Din) राज्यभरात साजरा करण्यात येतोय. या निमित्ताने किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं यंदाचं हे 350 वं वर्ष आहे. त्यामुळे रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून शिवभक्त या ठिकाणी महाराजांना वंदन करण्यासाठी आले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्या निमित्ताने मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतोय. छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत आजच्या दिवसातला हा मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे. किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आलीय. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातूनच  नाही तर देशभरातून मोठ्या प्रमाणात शिवभक्त रायगडावर येत आहेत. ढोलताशांच्या गजरात शिवरायांना मानवंदना दिली जाणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola