Raigad Suspected Boat : रायगडमध्ये बोटीत सापडल्या AK-47 रायफल्स, पोलिसांकडून अलर्ट जारी

Raigad Suspected Boat : रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन (Shrivardhan) येथे संशयास्पद बोट आढळली आहे. या बोटीमध्ये दोन  ते तीन एके-47 आढळले आहेत. त्याशिवाय हरिहरेश्वर (Harihareshwar) येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी माहिती देण्यास नकार दिला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola