Raigad Shivrajyabhishek Sohala : रायगडावर 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा, विविध कार्यक्रमाचं आयोजन
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShivrajyabhishek 2024 : युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishek Din) साजरा करण्यात येतोय. या निमित्ताने आज किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं यंदाचं हे 350 वं वर्ष आहे. या निमित्ताने किल्ले रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून शिवभक्त या ठिकाणी महाराजांना वंदन करण्यासाठी आले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा 350 वं वर्षे आहे. या निमित्ताने आज 6 जून रोजी किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतोय. छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत आजच्या दिवसातला हा मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे. किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आलीय. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात शिवभक्त रायगडावर येत आहेत. ढोलताशांच्या गजरात शककर्ते शिवरायांना मानवंदना दिली जात आहेत. कोल्हापूर गादीचे शहाजी राजे आणि संभाजीराजे रायगडावर जाणार आहेत. सकाळी 9 वाजण्याच्या सुमाराला मनोज जरांगे रायगडावर वंदन करण्यासाठी येणार आहेत. आरोग्यमंत्री तानाजी सावंत आज रायगडावर मानवंदना देणार आहेत.