Raigad Rain : रायगड जिल्ह्यातल्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Raigad Rain : रायगड जिल्ह्यातल्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
रायगड जिल्ह्यात काल रात्रभरापासून अतिमुसळधार पाऊस सुरु आहे.. त्यामुळं जिल्ह्यातल्या नद्यांच्या पातळीत वाढ झालीय.. कुंडलिका, पाताळगंगा आणि अंबा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली.. त्यामुळं रोहा, नागोठणे, खालापूर, खोपोली आणि आपटा परिसरातल्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय.. रोहा शहरातील कुंडलिका नदीवर असणाऱ्या छोट्या पुलावरून पाणी जाऊ लागल्यानंं हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय..