Raigad Irshalwadi Landslide Drone Visuals : इर्शाळवाडीतील भयावह घटनास्थळाची ड्रोन दृष्य ABP Majha

Maharashtra Irsalwadi Landslide: रायगड जिल्ह्यातील (Raigad) इर्शाळगडाच्या पोटात वसलेल्या इर्शाळवाडीवर (Irsalwadi) बुधवारी रात्री दु:खाचा डोंगर कोसळला. इर्शाळवाडीवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती एनडीआरएफने दिली आहे. बचाव पथकाला आतापर्यंत 98 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. मुसळधार पाऊस आणि दाट धुकं यामुळे एनडीआरएफ आणि अन्य यंत्रणांकडून सुरू असलेले घटनास्थळावरील बचावकार्य थांबवण्यात आले आहे. उद्या, शुक्रवारी पहाटे 5 वाजल्यापासून पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एनडीआरएफने दिली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola