Raigad Fort landslide : किल्ले रायगडावर दरड कोसळून सोलापूरच्या तरुणाचा मृत्यू
रायगड किल्ल्यावर दरड कोसळून एकाचा मृत्यू झालाय. प्रशांत अरुण गुंड असं या दुर्दैवी युवकाचं नाव असून तो मूळचा सोलापूरचा आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. गंभीर बाब म्हणजे एकाच आठवड्यात रायगडावर झालेला हा तिसरा मृत्यू आहे. गेल्या आठवड्यात शॉक लागून एकाचा मृत्यू झाला, त्यानंतर २ जून रोजी एका युवकाचं निधन झालं आणि आता दरड कोसळून आणखी एकाचा मृत्यू झालाय. या सर्वांच्या नातेवाईकांना प्रशासन मदत करणार का, आता हाच खरा प्रश्न आहे.