Raigad Suspicious Boat : रायगडमध्ये NIA चं पथक दाखल, अज्ञात बोट आणि शस्त्रांचा होणार तपास

Continues below advertisement

Raigad Suspicious Boat : रायगडच्या (Raigad) हरिहरेश्वर जवळ एक अज्ञात बोट आढळली. इतकंच नाही तर त्या बोटीत शस्त्रास्त्रं सापडल्यानं खळबळ उडाली होती. त्यानंतर अख्खा महाराष्ट्र (Maharashtra) हायअलर्टवर गेला आहे. कोकण, मुंबईच्या (Mumbai) समुद्रकिनाऱ्यांसह सर्व ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. रायगडमधील संशयित बोटप्रकरणात आता केंद्र सरकारची एन्ट्री झाली असून या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता एनआयएची (NIA) टीम रायगडमध्ये दाखल झाली आहे. एनआयए टीमकडून संशयित बोटीचा तपास सुरु आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) बोट आढळल्यानंतर या प्रकरणाचा तपास एटीएस (ATS) कडे वर्ग करण्यात आला होता. एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल (ATS Chief Vineet Agrawal) यांनी घटनास्थळी जाऊन बोटीची पाहणीही केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram