Joshi Wadewale Fight Mangaon : जोशी वडेवाल्यांची मुजोरी..गरोदर महिलेला केली मारहाण?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाश्ता करायला गेलेल्या मुंबईकर चाकरमाण्यांवर नामांकित हॉटेल मध्ये मारहाण
माणगाव मधील जोशी वडेवाले हॉटेल मधील घटना
गर्भवती महिला आणि दोन लहान मुलांना मारहाण
वड्यात मिठ जास्त झाल्याची केली होती विचारणा - बदल्यात होटेल कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना मारहाण
मुंबईवरून आपल्या गावी गणेशोत्सवासाठी जात असलेल्या मुंबईकर चाकरमानी यांच्यावर माणगाव मधील मुंबई गोवा हायवे लगत असणाऱ्या एका नामांकित जोशी वडेवाले हॉटेल मध्ये मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. नाश्ता करण्यासाठीं मागवलेल्या वड्यांमध्ये मीठ जास्त असल्याची तक्रार या व्यक्तींनी सबंधित हॉटेल चालकाला विचारली,मात्र तक्रार समजून घेण्याच्या अगोदरच तक्रारदार यांना दम देऊन शिव्या देण्यास या कर्मचाऱ्यांनी सुरूवात केली.या हॉटेल मद्ये काम करत असलेल्या अन्य कर्मचारी वर्गाने या ग्राहकांशी 2 छोट्या मुलांसह महिलांना मारहाण सूरु केली. यामधे एक महिला ही गर्भवती असल्याचे देखील समोर आले आहे.या महिलांवर चक्क खुर्ची उचलून मारहाण करुण त्यांचे मंगळसूत्र सुध्दा खेचण्याचा प्रयत्न या घटनेत समोर आल्याचे दिसून येत आहे. 2 अल्पवयीन मुलांना देखील नखाने ओरबाडे काढून त्यांच्यावर सुध्दा या हॉटेल मधील कर्मचारी यांनी हल्ला चढवला या संपुर्ण प्रकाराचे आपल्या मोबाईल मध्ये चित्रीकरण करणाऱ्या ग्राहकाला तुझा मोबाईल फोडून टाकीन अशी धमकी देण्यात आली.शिवाय आरोपी यांनी या ग्राहकांना जीवे मारण्याची भाषा वापरल्याची रेकॉर्डिंग या व्हिडिओ मद्ये रेकॉर्ड झाली आहे .या घटने संदर्भात आता माणगाव पोलिस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.