Rahul Gandhi : देशात जातनिहाय जनगणना आणि आर्थिक जनगणनाही व्हायला पाहिजे : राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात असून, आज राहुल गांधींची ठाणे जिल्ह्यातील भिवंडी चौक सभा पार पडली. या सभेतून राहुल गांधींनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मनरेगाचा पैसा २० ते २५ लोकांना दिल्याची टीका राहुल गांधींनी केली. तसेच देशात जातनिहाय जनगणना आणि आर्थिक जनगणनाही व्हायला पाहिजे, अशी मागणीही राहुल गांधींनी केलीय.