#Quarantine | गोरेगावमध्ये कोरोनाबाधितांसाठी सहा गोडाऊनमध्ये एक हजार 240 खाटांचं विलगीकरण केंद्र
मुंबईमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. ही संख्या अशीच वाढत राहिली तर या रुग्णांवर योग्य उपचार करता यावे यासाठी मुंबई पालिका आणि राज्य शासनाच्या वतीने गोरेगाव परिसरातील नेक्सा इथल्या गोडाऊनमध्ये विलगीकरण केंद्र सुरू केलेलं आहे. या केंद्रामध्ये 1240 बेड सज्ज करण्यात आलेले आहेत. या परिसरात असणाऱ्या सहा गोडाउनमध्ये हे बेड तयार करून ठेवले आहेत.