कोण कुणाचं बाप हे पुणेकर 2022च्या निवडणुकीत पाहतील, चंद्रकांतदादांच्या टीकेनंतर अंकुश काकडेंचं उत्तर
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन "आम्ही तुमचे बाप आहोत", अशी टीका चंद्रकांत पाटलांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केली आहे.
पुणे महापालिकेच्या 16 प्रभाग सामित्यांसाठी निवडणूक झाली. त्यापैकी 11 जागा या सत्ताधारी भाजपला मिळाल्या . चार जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्या तर लकी ड्रॉ पद्धतीने चिठ्ठी टाकून ठरवण्यात आलेली एक जागा कॉंग्रेसच्या पारड्यात पडली. मात्र चमत्कार होऊन सर्व 16 जागा आपल्याला मिळायला हव्या होत्या असं चंद्रकांत पाटील यांनी भाषण करताना भाजपच्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं.
Tags :
Pune Lockdown Deputy CM Ajit Pawar Chandrakant Patil Lockdown Pune Pune Corona Ajit Pawar Corona