Zero Hour Pune Car Accident : ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईची टांगती तलवार

Continues below advertisement

Zero Hour Pune Car Accident : ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईची टांगती तलवार

पोर्श अपघाताची राज्यभर चर्चा आहेत.. ज्यात दिवसेंदिवस टर्न अँड ट्विस्ट येतायेत.. आजही अनेक घडामोडी घडल्यात.. त्यानुसार अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाची पुणे पोलिस बाल निरिक्षण गृहात जाऊन चौकशी करणार आहेत.. त्यासाठी पुणे पोलिसांनी बाल हक्क न्याय मंडळाकडे अर्ज केलाय.. या मुलाची बाल निरिक्षण गृहातील कोठडी संपत असुन त्याआधी ही चौकशी होण्याची शक्यता आहे.. दुसरीकडे अल्पवयीन कार चालकाचे वडील विशाल अग्रवाल आणि त्याचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल.. या दोघांना ड्रायव्हर गंगाराम पुजारीला डांबून ठेवल्या प्रकरणी पुन्हा एकदा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळालीय.. यात दोघेही जामीनासाठी अर्ज करु शकतात.. असं असलं तरी विशाल अग्रवाल यांना ससूनमध्ये रक्त नमुने बदलल्याच्या प्रकरणात पुन्हा ताब्यात घेवू शकतात.. 
दुसरीकडे अल्पवयीन कार चालकाचे रक्तनमुने बदलणाऱ्या डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.. कारण, त्यांची विभागीय चौकशीचे होणारय... आणि जर त्या चौकशीत आरोप सिद्ध झाले तर तिघांनाही सेवेतून बडतर्फ केलं जावू शकतं.. सध्या तिघांनावर निलंबनाचीच कारवाई झालीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram