NIA Raid Pune : पुण्यातील गुलटेकडी परिसरात राहणाऱ्या तरुणाची एनआयएकडून चौकशी : ABP Majha
Continues below advertisement
पुण्यातील गुलटेकडी परिसरात राहणाऱ्या तरुणाची एनआयएने चौकशी केलीय. साफवान शेख असं या तरुणाचं नाव असून, तो पुण्यातील अरिहंत कॉलेजचा विद्यार्थी असल्याचं समोर आलंय. साफवान इसिस मॅाड्यूलच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी असल्याचं उघड झालंय. ही कारवाई एनआयएच्या बंगळुरु येथील पथकाने केलीय. तसेच, अमरावती जिल्ह्याच्या अचलपूरमध्ये एनआयएनं छापे टाकलेत. या छापेमारीत 19 वर्षांच्या सय्यम नावाच्या तरुणाला ताब्यात घेतलंय. या तरुणाची सध्या चौकशी सुरु आहे. एनआयएच्या पथकाला काही कागदपत्रे आणि लॅपटॉपही हाती लागलेत. हा तरुण व्हॉट्सअॅप ग्रूपच्या माध्यमातून जिहादी संघटनांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आलीय.
Continues below advertisement