Remdesivir Shortage : बारा तास रांगेत उभं राहूनही रेमडेसिविर मिळालं नाही, महिलेला रडू कोसळलं...
Continues below advertisement
पुणे : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंधही लादण्यात आले आहेत. अशातच राज्यात वीकेंड लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. अशातच आता राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत असून अनेक जिल्ह्यांमध्ये बेड उपलब्ध नाहीत. बेडसाठी रुग्णांना वणवण करावी लागत आहे. अशातच कोरोना रुग्णांवर उपचारासाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा राज्यात तुटवडा भासत आहे. अनेक ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचं उघड झालं होतं.
Continues below advertisement