Lockdown in Pune? पुण्यात लॉकडाऊन की आणखी कडक निर्बंध? उपमुख्यमंत्री घेणार आढावा, काय निर्णय होणार?
महाराष्ट्रात बुधवारी विक्रमी 31 हजार 855 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. हा आकडा सर्वांच्याच चिंता वाढवणारा आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करूनही हा संसर्ग कमी होताना दिसत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात नागरिकांना कठोर निर्बंधांना सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, आज नवीन 15 हजार 098 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2262593 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 247299 सक्रीय रुग्ण असू राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.21% झाले आहे.
Tags :
Coronavirus Corona Virus Pune News Pune Corona Pune Lockdown Corona In Pune Lockdown In Maharashtra Coronavirus