Rangava dies | स्पेशल रिपोर्ट | माणसांच्या जंगलात हरवलेल्या गव्याचा तडफडून मृत्यू.. कोथरूडमधील घटना

जंगलात बिनधास्तपणे - बिनदिक्कतपणे वावरणारा गवा मानवी वस्तीत काही तासही जिवंत राहू शकला नाही. पुण्यातील कोथरूड भागात घुसलेल्या गव्याचा उपचार सुरु असतानाच मृत्यू झाला आहे. पुण्यातील कोथरूडमध्ये बुधवारी सकाळी रानगवा आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या गव्याला बघण्यासाठी आणि त्याचे फोटो आणि व्हिडीओ हातातील मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी लोकांची जी गर्दी उसळली त्यामुळे हा गवा बिथरला आणि सैरावैरा पाळायला लागला. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर या गव्याला पकडण्यात यश आलं खरं पण या सगळ्या गोंधळात गव्याचा मात्र मृत्यू झाला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola