Gram Panchayat Election Results 2021 | लय भारी! विजयी पतीला खांद्यावर घेऊन पत्नीचा जल्लोष
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGram Panchayat Election Results 2021 गावगाड्यातल्या राजकीय पटलावर मागील कित्येक सुरु दिवसांपासून सुरु असणाऱ्या हालचाली आणि तर्कवितर्क अखेर सोमवारी निकाली निघाले. कोणत्या गावावर कोणाची सत्ता असणार आणि ग्रामस्थांचा कल कोणाला मिळणार, हे चित्र ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालातून सोमवारी स्पष्ट झालं. एकिकडे भाजप, महाविकासआघाडीकडून निवडणुकीच बाजी मारल्याचा दावा सातत्यानं करण्यात येत आहे, तर दुसरीकडे मात्र आता गावखेड्यात विजयी उमेदरावांच्या मिरवणुका आणि वियजोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. अशाच एका अनोख्या विजयोत्सवानं सध्या साऱ्या राज्याचं लक्ष वेधलं आहे.
पुणे जिल्ह्यतील पाळू ग्रामपंचायतीमध्ये जाखमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा दारूण पराभव झाला. जाखमाता देवी ग्रामविकास पॅनलने 7 पैकी 6 जागावर वर्चस्व मिळवलं. या घवघवीत यशा मागे महिलांचा मोठा मोलाचा वाटा होता. त्यामुळं, विजयाचा जल्लोष करत असताना गावातील विजयी उमेदवारांच्या पत्नीनं आपल्या पतीच्या विजयासाठी त्यांना खांद्यावर उचलून घेत मिरवणूक काढत आनंद साजरा केला.