वानवडीत मृत्यू झालेल्या युवतीचा लॅपटॉप जमा करा, धनराज घोगरे यांना पोलिसांची नोटीस

Continues below advertisement

पुणे : परळीतील युवतीच्या पुण्यातील वानवडी भागात झालेल्या मृत्यूनंतर तिचा लॅपटॉप भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नगरसेवक धनराज घोगरे यांनी चोरल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यासाठी नगरसेवक धनराज घोगरे यांना नोटीस बजावून लॅपटॉप जमा करण्यास सांगण्यात आलं आहे. मात्र धनराज घोगरे यांच्याकडे लॅपटॉप नसून त्यांना विनाकारण त्रास देऊ नये, असं भाजप नेत्यांच म्हणणं आहे. त्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ आणि इतर नेते नगरसेवक धनराज घोगरे यांच्यासह वानवडी पोलिसांना भेटून निवेदन दिलं.

धनराज घोगरे यांनी लॅपटॉप चोरला नसून पोलीस त्यांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा आणि घोगरेंवर कारवाई करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. पोलीस आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असले तरी आपण घाबरणार नाही, असं नगरसेवक घोगरे यांनी म्हटलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram