WEB EXCLUSIVE | Yerawada Jail tourism | येरवडा कारागृहातील स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास 'माझा'वर

Continues below advertisement

येरवडा तुरुंगात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 'जेल पर्यटना'ला सुरुवात करण्यात आली. हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे. हे महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठं जेल आहे. तब्बल 512 एकर परिसरात पसरलेल्या या जेलमध्ये एकाच वेळी 5000 कैदी राहू शकतात.

दक्षिण आशियातील मोठ्या जेलच्या यादीत येरवडाचे नाव आहे. देशाच्या आणि राज्याच्या इतिहासात येरवडा आणि इतर तुरुंगांचं खूप महत्व आहे. अनेक ऐतिहासिक घटना इथे घडल्या आहेत. राज्यात पहिल्यांदाच 'जेल पर्यटन' हा उपक्रम सुरु केला जात आहे. विद्यार्थी, इतिहास अभ्यासक आणि सामान्य नागरिकांना या उपक्रमात जेलमध्ये जाऊन ऐतिहासिक घटनांची माहिती घेता येईल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram