Web Exclusive | ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना प्रतिष्ठेचा सरस्वती सन्मान पुरस्कार
ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना 2020 वर्षीचा सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. शरणकुमार यांच्या‘सनातन’ या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दिल्ली येथील के. के. बिर्ला फाऊंडेशनकडून 1991 पासून हा पुरस्कार दिला जातो आहे. 15 लाख रुपये, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे.