Vasant More Journey : Raj Thackeray यांचा आदेश झेलणारा मनसैनिक, कोण आहेत वसंत मोरे ? ABP Majha
वसंत मोरे सध्या चर्चेत आहेत, ते राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या सभेमुळे. त्या सभेत राज यांनी मुस्लिम समाजाच्या मशिदींवरील भोंग्यांना टार्गेट केलं आणि भोंग्यांविरुद्ध हनुमान चालीसा असं युद्धच सुरू झालं. याला अनेक कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला तर काहींनी विरोध केला. त्या विरोधकांच्या यादीत होतं एक मोठं नाव आणि ते नाव म्हणजे, वसंत मोरे.