प्लाझ्मादान करणाऱ्यांना प्रोत्साहनपर दोन हजार रुपये दिले जाणार, पिंपरी-चिंचवड महापालिकेचं अनोखं पाऊल
पिंपरी-चिंचवड : कोरोना रुग्णांसाठी रेमडिसिवीर प्रमाणेच प्लाझ्मा थेरपी ही वरदान ठरते. पण प्लाझ्माचा ही प्रचंड तुटवडा जाणवू लागलाय. याला कारण ठरतंय ते प्लाझ्मा दान करणाऱ्यांची उदासीनता. याचा परिणाम हा थेट कोरोना रुग्णांच्या जीवावर बेताताना दिसतोय. त्यामुळे हा तुटवडा मिटविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. प्लाझ्मा दान करणारे पुढे यावेत म्हणून प्लाझ्मा दान करणाऱ्यांना प्रोत्साहनात्मक दोन हजार रुपये दिले जाणार आहेत. जेणेकरून मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा दान व्हावा आणि कोरोना रुग्णांचा जीव वाचावा, असा यामागचा हेतू असल्याने महापालिकेने हा निर्णय घेतलाय. पण हे प्लाझ्मा तुम्हाला महापालिकेच्या रक्त पेढीतच दान करावे लागणार आहे. शिवाय पालिका रुग्णालयाबाहेरच्या रुग्णांना देखील प्लाझ्मा मोफत दिला जाणार आहे. आत्ता 200 मिलीसाठी सहा हजार रुपये घेतले जायचे.