Coronavirus | पुण्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले, दुबईहून परतलेलं दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह
पुण्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. हे दोन्ही रुग्ण 1 तारखेला दुबईहून परतले आहेत. दोन्ही रुग्णांवर सध्या पुण्यातील नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरु आहेत. हे दोन्ही रुग्ण पती-पत्नी आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नसल्याचं विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी, धुळवड तसंच विविध यात्रा अशी गर्दीची ठिकाणं टाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.